दौंड तालुक्यात वनविभाग ॲक्शन मोडवर (फोटो- सोशल मीडिया)
पुणे जिल्ह्यात वाढला बिबट्यांचा मुक्त संचार
मानवावर होणारे हल्ले रोखण्यासाठी दौंड तालुका वनविभाग सतर्क
बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा बळी
पाटस: दौंड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाळीव जनावरांवर तसेच मानवावर होणारे हल्ले रोखण्यासाठी दौंड तालुका वनविभाग सतर्क झाला असून वनविभागाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तालुक्यातील बिबट-प्रवण नऊ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून भीमा नदीकाठावर कानगाव हातवळण व नानगाव परिसरात बिबट्यांची हालचाल सुरू होती. काटेरी झुडपे व उसाच्या शेतात त्यांनी ठाण मांडले होते. जसजशी ऊस तोडी होऊन शेती कमी झाली. तसे हे बिबट बाहेर पडून मानववस्तीच्या दिशेने सरकू लागले. त्यानंतर पाटस, वरवंड, यवत या पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्येही त्यांचा वावर वाढला. काही वर्षांपूर्वी वरवंड येथे मादी बिबट्याला वनविभागाने पकडले होते.
दरम्यान, बिबट्याने वारंवार पाळीव जनावरांची शिकार केली असून तालुक्यात दोन चिमुकल्यांचा बळीही गेला आहे. या घटनांमुळे नागरिकांत तीव्र दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी शेतात काम करण्यास घाबरू लागले असून अनेकांनी बिबट्याच्या भीतीपोटी अनेकांनी रात्रीचे शेतात जाणे बंद केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येत शासनाने नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दौंड तालुक्यात वनविभाग पूर्ण क्षमतेने मैदानात उतरला असून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी व्यापक मोहीम सुरू आहे.
तालुक्यात या ठिकाणी लावले पिंजरे
दौड तालुक्यात दापोडी येथील मांगोबाचा माळ, पाटस परिसरातील शेंडगे वस्ती, मळद रावणगाव शिवेवर असलेल्या भोसले वस्ती, नांदूर येथील घुलेवस्ती, नांदूर येथील नांदूर खामगाव शिवेवर , राहू येथील डुबे वस्ती आणि सोनवणे मळा, दहिटणे येथील पिलाने वस्ती आणि वाळकी येथील थोरात मळा अशा नऊ ठिकाणी पिंजरे लावले आहेत. तसेच तालुक्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्या हालचाली वर लक्ष्य ठेवण्यासाठी ३० ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.
आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video
सावजाच्या मागे आला बिबट्या
सध्या पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वावर वाढला आहे. शिक्रापूर, जुन्नर परिसरात बिबतींचा वावर वाढला आहे. कमी होणारी जंगले त्यामुळे जंगली प्राणी आता गाव वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकताच एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे. दरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक चिमुकला थोडक्यात बचावला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Ans: दौंड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Ans: नऊ ठिकाणी पिंजरे लावले असून, बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्या हालचाली वर लक्ष्य ठेवण्यासाठी ३० ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.






