आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Mahapalika Elections) गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम ठरविण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरण्यात आली असून, आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार जुलै २०२५ मध्ये मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागात होऊ घातलेल्या निवडणुकीची प्रकिया सुरू करण्यात आली असून, गेल्या आठवड्यात प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता मतदार यादी जाहीर करण्यात येवून प्रत्येक विभागातही मतदारांना पाहण्यासाठी याद्या ठेवण्यात आल्या आहेत.
Indian Tejas fighter jet crashed: दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमान तेजस कोसळले
गेल्या निवडणुकीत १०,७३,४०८ इतके मतदार होते. त्यात पुरूष मतदारांची संख्या ५. ७०,६९९ तर महिलांची संख्या ५,०२,६३७इतकी होती. आठ वर्षांनी त्यात २,८०,६६९ नवीन मतदारांची भर पडली आहे.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता मतदार यादी जाहीर होताच, प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी याद्या घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागात गर्दी केली होती. प्रत्येक इच्छुकांकडून मतदार यादीसाठी अर्ज घेतल्यावरच त्यांना यादी उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळे अनेकांना तासन्तास ताटकळावे लागले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४२ अर्ज मतदार यादीसाठी प्राप्त झाले होते.
या मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार टाकण्यात येणार आहे. याचाच अर्थ एका मतदाराचे दोन वा अधिक ठिकाणी समजले जाईल.
ज्या मतदारांची नावे दोन प्रभागात आहे त्यांच्याकडून घरोघरी जावून बीएलओ विकल्प घेणार असून, तसा फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. बीएलओ घरी न पोहोचल्यास मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांकडूनही मतदाराकडून विकल्प अर्ज घेतला जाईल.
प्रभाग क्रमांक ३,६,१४,२५,३० या प्रभागातील मतदारांची संख्या ५० हजारापेक्षा अधिक आहे. त्यातही प्रभाग क्रमांक २५ मध्ये ५८,२४६ इतके सवाधिक मतदार आहेत.
सर्वाधिक कमी मतदारांची संख्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये आहे. अवघे ३१,५२१ इतके कमी मतदार आहेत.






