शिंदे गटाचा पदाधिकारी अन् मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांचे फोटो बॅनरवरून गायब
डोंबिवली-विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूकांकडून तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून इच्छूक उमेदवार कामाला लागले आहेत. यात काही असे इच्छूक आहे. पक्षाच्या धोरणा विरोधात जाऊन निवडणूक रिंगणात येऊ शकतात. कल्याण डोंबिवलीतही अशी अनेक नावे आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्याकडून नागरीकांना सणांच्या शुभेच्छा देताना त्यांच्या बॅनरवरुन मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांचे फोटो गायब असल्याने जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
कल्याण डोंबिवली शिवसेना आणि भाजपमध्ये कधीही पटले नाही. हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. १९९५ सालापासून महापालिकेत यांची सत्ता आहे. परंतू अनेकदा असे समोर आले. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपसात भिडले. इतकेच नाही तर कोरोना पूर्वी भाजपने महापालिकेत युती तोडली होती. आत्ता विधानसभा निवडणूक आली आहे. डोंबिवलीत देखील अनेक इच्छूक आहेत. या इच्छूकांमध्ये एक नाव आहे दिपेश म्हात्रे यांचे. दिपेश म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव आहेत. लोकसभा निवडणूकीत त्यांनी कामही केले.
विधानसभा निवडणूक तयारी सुरु केली आहे. ते डोंबिवली मतदार संघातून इच्छूक आहे. दीपेश म्हात्रे यांच्या मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरेाधात बॅनरबाजी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या स्वामी नारायण कॉम्प्लेक्स ला नोटिस देखील बजावण्यात आली आहे. त्यानंत ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते. तिथे काय चर्चा झाली ते गुलदस्त्यात आहे.
दीपेश म्हात्रे यांनी गणेशोत्सवा दरम्यान आणि नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले. त्या बॅनवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो आहे. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो नाहीत. त्यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे पद म्हात्रे यांच्याकडे आहे. पण नेत्यांचे फोटो बॅनरवरून गायब झाल्याने म्हात्रे ठाकरे गटात जाणार की, अपक्ष निवडणूक लढविणार हे लवकर स्पष्ट आहे. त्यांच्या शुभेच्छा बॅनरवरुन मुख्यमंत्री आणि खासदारांचा फोटो गायब झाल्याने एकच चर्चा रंगली आहे.