धुळे : धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील बामणे या गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. वारंवार तक्रारी करून देखील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.
संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील पी एम किसान योजनेसंदर्भातील रजिस्ट्रेशनमध्ये येत असलेल्या त्रुटी प्रशासनाकडून दूर करण्यात येत नाही. प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी कॅम्प भरवण्यात येईल व या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा यासंदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतील असे मेसेजेस शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले. परंतु त्यानंतर अद्यापही कुठल्याही प्रकारचे कॅम्प घेण्यात आले नसल्यामुळे पीएम किसान योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.
[read_also content=”शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं, भाजप जवळच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-should-be-the-prime-minister-excitement-due-to-statements-made-by-leaders-close-to-bjp-nrdm-263473.html”]
दरम्यान पी एम किसान योजनेसंदर्भात रजिस्ट्रेशन करून वर्ष उलटून गेले असले तरीही अद्याप पर्यंत पी एम किसान योजनेच्या अंतर्गत कुठलाही लाभ संबंधित शेतकऱ्यांना झाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.






