संग्रहित फोटो
पुणे : पीएमपीचा प्रवास रविवारपासून प्रवाशांना महागात पडणार आहे. पीएमपी प्रशासनाने पाठविलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला पुणे प्रादेशिक परिवहन समिती (आरटीए) ने मंजुरी दिली आहे. दरवाढ १ जून पासून लागू होणार आहे. ११ वर्षानंतर पीएमपीच्या तिकिटात दरवाढ झाली आहे. सध्याच्या तिकिटाच्या दरात दुपटीने वाढ झाली असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीएमपी बसचे संचालन हे पुणे, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रात आहे. १ ते ८० किलोमीटर असा पीएमपीचा संबंधित मार्गावर प्रवास होतो. ८० किलोमीटरच्या प्रवासासाठी पीएमपीए ११ टप्पे ठरविले आहेत. त्या टप्पानुसार दरवाढ झाली आहे. हे दर रविवारच्या पहाटेपासून लागू होणार आहेत. तिकीटासह पासच्या दरात देखील पीएमपीने वाढ केली आहे. पीएमपी प्रशासनाने यापूर्वी २०१४ मध्ये दरवाढ लागू केली होती.
नवीन दररचना: