जळगाव: मदरशाच्या नावाखाली बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सांगलीत जाणाऱ्या 59 संशयित मुलांची सुटका करण्याची कारवाई (Child Trafficking) करण्यात आली आहे. यात 4 संशयितांना अटक (Arrest) करण्यात भुसावळ आरपीएफ पोलीसांना यश आले असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी दिली. (Jalgaon Crime News)
[read_also content=”चिमुकल्या नातीसमोरच सासऱ्याने सूनेची गळा आवळून केली हत्या, पुण्यातल्या खून प्रकरणाचं नक्की काय आहे कारण? https://www.navarashtra.com/maharashtra/father-in-law-murdered-daughter-in-law-in-front-of-granddaughter-nrsr-407203.html”]
दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये धडक कारवाई
दानापूर पुणे एक्सप्रेसमधून 8 ते 15 वर्षे वयोगटातील 59 मुलांची तस्करी केली जात आहे. बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीतल्या मदरशात या मुलांना आणलं जात जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफ पोलीसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ रेल्वे स्थानकावर दानापुर पुणे एक्सप्रेस आली असता एक्सप्रेसच्या बोग्यांची कसून तपासणी करीत वेगवेगळया बोग्यामधून 29 मुलांना उतरविण्यात आलं. तसेच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. भुसावळ येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आरपीएफ व जीआरपी पथकाने ही धडक कारवाई केली.
मनमाड स्थानकावर 30 तर भुसावळला 29 मुलांची सुटका
तसेच मनमाड स्थानकादरम्यान पोलीस पथकांची तपासणी कारवाई सुरू असतांना अजून 30 मुले आणि चार संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना मनमान स्थानकात उतरविण्यात आले. भुसावळ येथे उतरविण्यात आलेल्या 29 मुलांना जळगाव बाल निरीक्षणगृहात तर मनमाड स्थानकावर उतरविलेल्या 30 मुलांना नाशिक बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. आरपीएफ व जीआरपी पथकातील पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये सदर बालकांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
[blockquote content=”सांगलीकडे नेण्यात येत असलेल्या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात बाल निरीक्षणगृहात रवाना करण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती घेण्यात येत आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया व ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.” pic=”” name=”- श्रीनिवास राव, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे भुसावळ”]