कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड
कल्याण बाजारपेठेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून सहा मोबाईल एक दुचाकी हस्तगत केली आहे. दोन्ही चोरटे बाजापेठेत गर्दीचा फायदा घेऊन भाजीविक्रेते आणि ग्राहक यांचे मोबाईल चोरत होते. पहाटेच्या सुमारास, सकाळी तसेच रात्रीचा सुमारास या घटना घडत होत्या. या चोरांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. आता अखेर पोलिसांनी या मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
हेदेखील वाचा- मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; आत्ताच प्रवासाचं नियोजन करा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज शेख आणि इरफान शेख अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. शहबाज शेख आणि इरफान शेख या दोघांमुळे भाजीविक्रेते तसेच भाजी फळे खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. मात्र आता अखेर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा- दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात कोसळली 7 फूट उंच भिंत; दोघांचा जागीच मृत्यू
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजीविक्रेते तसेच भाजी फळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. पहाटेच्या सुमारास, सकाळी तसेच रात्रीचा सुमारास या घटना घडत होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरटे कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी आणि फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल लंपास करत होते. याचप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रूपवते बाबासाहेब डुकले, ए एस आय सुरेश पाटील, हवालदार सचिन साळवी यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. सराईत चोरटा शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार इरफान हा एपीएमसी मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचत इरफानला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज शेख आणि इरफान शेख या दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून चोरीची दुचाकी आणि सहा महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहबाज आणि त्याचा साथीदार इरफान याने आणखी मोबाईल चोरले असावेत असा संशय पोलीसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत .