पुणे: लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभुमीवर शहर पोलीस दलातील (Pune City Police) तब्बल १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Police Inspectors Transfers) करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि २४) काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यांची पदे यांची माहिती समोर आली आहे.
पुण्यामध्ये बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे
दादासाहेब चुडाप्पा (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे ते वाहतूक विभाग)
सुनिल माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा)
रविंद्र गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, खडक पोलीस ठाणे)
दिपाली भुजबळ (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे (बदली आदेशाधिन) ते वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे)
हेमंत पाटील (वरिष्ठ निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)
संदिप देशमाने (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे ते वरिष्ठ वरिष्ठ निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे)
सुनिल जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते कोर्ट कंपनी)
अभय महाजन (वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोलीसन निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
विजय कुंभार (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष) ते वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे)
राजेंद्र सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे ते विशेष शाखा)
गिरीश दिघावकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे)
बालाजी पांढरे (वरिष्ठ निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३)
निलीमा पवार (वरिष्ठ निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
अश्विनी सातपुते (पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक एक ते वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस ठाणे)
निलम भगत (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, कोर्ट आवार)
श्रीहरी बहिरट (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३ ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष)
राजेंद्र लांडगे (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक एक पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस ठाणे, अजय कुलकर्णी व पोलीस निरीक्षक, (गुन्हे) चतु:श्रृंगी पोलीस ठाणे, अंकुश चिंतामण हे पुढील आदेश होईपर्यंत अनुक्रमे वारजे माळवाडी व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहतील.