कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला. शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे.
शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसने त्या जागा सांगाव्यात असे म्हटले आहे.