औरंगाबाद – मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद केले पाहिजे. अधिकारी दबावाला बळी पडून खोटे रिपोर्ट तयार करतात, त्यामुळे शिक्षकांवर कारवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आमदारकी चाटण्यासाठी नाही, मी शिक्षकांना तीन महिन्यात रुम बांधून देतो त्यांनी दर्जेदार शिक्षण द्यावे असा घणाघात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला.
शिक्षकांविरोधात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिक्षकांतर्फे औरंगाबादेतील आमखास मैदानात प्रशांत बंब यांच्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमदार बंब यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा शिक्षकांसह विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.
प्रशांत बंब यांनी आमदार विक्रम काळे आणि मोर्चेकरी शिक्षकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोर्चातील शिक्षक आणि त्यांचे नैतृत्व करणारे आमदार बोगस आहेत. मतदार संघातील गोष्टी सुधारून दाखवा असे आव्हान मला दिले मी त्यांचे आव्हान स्विकारतो.