मंत्री प्रताप सरनाईक (फोटो -सोशल मिडिया)
मुंबई: राज्याच्या राजकारणात महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण “महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय,” असे वक्तव्य करून भाजप आमदार नितेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नितेश राणे यांनी हे विधान शिवसेनेच्या बाबतीत केले होते. आता त्याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते मंत्री नितेश राणे?
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे सर्वांनी लक्षात ठेवा, असा धमक वजा इशारा त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिला आहे. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचलं तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला होता.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
राजकीय एकजुटीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार कुटुंबांनी समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठा विकास झाला. जर ही कुटुंबे एकत्र येण्याची भावना व्यक्त करत असतील, तर त्यात काहीही गैर नाही.”
Maharashtra Politics : ‘नितेश राणे जरा जपून बोला…’; मोठ्या राणेंनी धाकट्या राणेंचे टोचले कान