मुंबई : येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिका निवडणूक (Bmc Election) होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांच भुमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार असून आता कार्यक्रमासाठीचा संपूर्ण खर्चदेखील महापालिकेच्याच माथी मारण्यात आला आहे. असा आरोप सामनातून करण्याता आला आहे. विशेष म्हणजे, या भूमिपूजनात राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्प, ठाण्यातील प्रकल्पांचाही समावेश असल्याची माहिती आहे. शिवाय श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ सरकारच्या दबावाखाली याआधी भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांचेही पुन्हा भूमिपूजन करण्यात येणार आहे. पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यक्रमाच्या तयारीसाठी जुंपली आहे.
[read_also content=”पुुणे बंगळुरू महामार्गावरील दोन बोगद्यांच काम प्रगतीपथावर, प्रवाशांचा वेळ वाचणार! अपघातही टाळता येणे शक्य https://www.navarashtra.com/maharashtra/the-work-of-two-tunnels-on-the-pune-bangalore-highway-is-in-progress-the-time-of-the-passengers-will-be-saved-accidents-can-also-be-avoided-nrps-362230.html”]
पंतप्रधान येत असलेल्या कार्यक्रमासाठी 75 हजार लोक येण्याचा अंदाज असून यासाठीची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे.
यामध्ये बैठक व्यवस्था, पाणी, फिरती शौचालये, स्वच्छता आणि महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या कामांची ऑडिओ, व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करण्याची जबाबदारी राहणार आहे.
समुद्रात जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सात सिकरेज ट्रिटमेंट प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये भांडुप प्रकल्प – 2537 हजार कोटी, करळी – 5811, कर्सेका – 1604, कांद्रे – 4293, मालाड 7107, धाराकीसाठी – 4636 हजार कोटी असा एकूण 25 हजार 988 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या 400 किमीच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी, भांडुप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 670 कोटी, सौंदर्यीकरणांच्या कामांसाठी एकूण 1750 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.