Prithviraj Chavan News: 'मराठी पंतप्रधानाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा सूचक विधान'; सध्याचे पंतप्रधान...
१९ डिसेंबरला देशात राजकीय उलथापालथ होईल होईल, असा दावा आपण कधीच केला नाही. ती फक्त शक्यता व्यक्त केली होती. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच, एपस्टिन प्रकरणाशी संबंदित अनेक नवीन कागदपत्रेही समोर येऊ शकतात. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणासोबतच भारतीय राजकारणावरही होऊ शकतो. असही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
मराठी व्यक्तीच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, “मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, ही शक्यता मी आधीही व्यक्त केली होती. पण ती व्यक्ती बारामत किंवा कराडमधली नसेल, ती मराठी व्यक्त कोण असू शकते, हे राजकारणातील जाणकारांना चांगलंच माहिती आहे. पण देशाचे विद्यमान पंतप्रधान मात्र ‘ऑन बोर्ड’ आहेत. अनेक कागदपत्रातून पुढे येत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा एपस्टिन प्रकरणाचा उल्लेख केला. जेफ्री एपस्टिन नावाच्या व्यक्तीने अनेक आंतराराष्ट्रीय आणि राजकीय नेत्यांची गुप्तपणे चित्रफित तयार केली होती, या प्रकरणात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोपही कऱण्यात आले होते. या प्रकरणातील दोषी असलेल्या सर्वांची नावं जगासमोर यायली हवीत, अशी मागणी अमेरिकेतही होत आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही मेल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा उल्लेख असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीदेखील एपस्टीनची भेट घेतली होती का, याचं उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमेरिकेत सध्या एपस्टीन फाईलबाबत मोठा गदारोळ सुरू आहे, अनेक कागदपत्रांमधील अनेक नावे नष्ट करण्यासाठी त्यावर काळ्या रंगाने ती मिटवण्यात आल्याने पूर्ण सत्य जगासमोर आले नाही. या फाईलमध्ये काही भारतीयांची नावे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Politics: “माझे 1000 रुपये अजून…”; ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका
हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांच्या आणि एपस्टीन यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, आपण अद्याप सर्व कागदपत्रे तपासलेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारण हा सुमारे ३०० GB चा प्रचंड डेटा असून त्यामध्ये लक्षावधी फोटो, लक्षावधी कागदपत्रे आणि ई-मेल्सचा समावेश आहे.
या डेटामधून सर्व माहिती समोर येऊ शकते, पण ते काम अजिबात सोपे नाही, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत जगभरातील माध्यमांना याच डेटाचा सखोल अभ्यास करावा लागणार असून, हेच काम सर्व मीडियासमोर असणार असल्याची पुष्टीही त्यांनी दिली.






