GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क (फोटो- istockphoto)
पुणे: शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापािलका प्रशासनाने ‘आरओ’ प्लांटसाठी नियमावली तयार केली आहे. या प्लांटमधील पाण्याची वारंवार तपासणी करण्याचे बंधन चालकांवर घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील किरकटवाडी, नांदाेशी, नांदेड आदी भागात माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजारांचे रूग्ण आढळून आले होते. सदर आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पुर्वीच महापािलकेच्या आरोग्य विभागाने या भागातील महापािलकेचा पाणी पुरवठा, खासगी टॅंकर, आरओ प्लांट मधुन पुरवठा हाेणाऱ्या पाण्याचे नुमने तपासणीसाठी पाठविले हाेते. या तपासणीमध्ये टॅंकर आणि आरओ प्लांटमधील पाण्यात ही जीबीएस आजारास काररणीभुत घटक आढळून आले आहेत.
या पार्श्वभुमीवर महापािलकेने ज्या भागामध्ये जीबीएसचे रुग्ण आवळून आले आहेत त्या भागातील ३० खाजगी ‘आरओ ’ प्लांट बंद करण्याबाबत नाेटीस देऊन सदर प्लांट सीलबंद केले हाेते. परंतु, त्यानंतरही काही प्लांट छुप्या पद्धतीने सुरु झाल्याची चर्चाही रंगली हाेती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील प्रकरण १४ नियम १८ नुसार ज्यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल असा कोणताही खाजगी जलप्रवाह, झरा, तलाव, विहीर, अन्य जागा, इत्यादी चांगल्या प्रकारे दुरुस्त स्थितीत ठेवण्याची किंवा सदर खोतांबर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यामुळे उपाययाेजना करण्यात येत अाहे. सद्यस्थितीत किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, इत्यादी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नाही.
प्रशासनाकडून मान्यता
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या व विहित निकषांची पूर्तता करणान्या खाजगी आरओ प्लांट पुन्हा सुरु करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे, परंतु त्याकरीता स्वतंत्रपणे नियमावली तयार करणे आवश्यक असल्याने महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीला प्रशासनाने मान्यता दिली आहे. या नियमावलीचे पालन आरओ प्लांटस चालकांना करावी लागणार आहे. सदर नियमावलींची पुर्तता करणाऱ्या आरओ प्लांटस चालकांना पुन्हा प्लांट सुरु करण्याची परवानगी दिली जाणार आहे. सदर कार्यवाही सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्या मार्फत केली जाणार आहे.
काय आहे नियमावलीत ?
– आरओ प्लांटसची महापालिकेकहे नाेंदणी करणे आवश्यक
– आरओ प्लांटसच्या मुळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्ती करणाऱ्या संस्थेकडून याेग्यतेचा दाखला सादर करावा किंवा देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरु असतानाचे सुस्पष्ट, तारीख, वेळ व जीओ टॅगसह फोटो काढावेत.
– मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांचेकडून सदर प्लांटच्या आउटलेटचे पाणी जागतिक आरोग्य संस्थेच्या अायएस 10500 (2012) नुसार शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा.
Pune GBS Update: नक्की पाणी प्यायचे कोणते? आधी टँकरच्या पाण्यात दूषितता अन् आता थेट…; जाणून घ्या
– राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे महानगरपालिका प्रयोगशाळेकडून सदर आरओ प्लांटसचे पाणी पिण्यास योग्य आहे का याची वारंवार तपासणी करून अहवाल सादर करावा
– आरओ प्लांटसला पुणे महापालिकेचे पाणी वापर करत असल्यास सदर नळजोड नियमान्वित करून, बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल जमा करावे
– संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडीन आरोग्य निरीक्षकांनी आरओ प्लांटसचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी व पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्याबाबत कारवाई करावी.