Pune Municipal Election 2026: बांधकामांची वाढ, पण समस्या कायम; वडगाव शेरीत पायाभूत सुविधांचा तुटवडा
उगाव/वडगाव शेरी परिसरात मागील दशकात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. तरीही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइनचे वारंवार लीकेज, दूषित पाणीपुरवठा, मोकळ्या जागांतील कचऱ्याचे ढीग आणि पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी या समस्या कमी झालेल्या नाहीत. हरीनगर-आदर्शनगर, सैनिकवाडी, उज्ज्वल गार्डन, कल्याणीनगर आदी भागांत मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होऊन पाणी थेट घरांमध्ये शिरते, अशी नागरिकांची तक्रार आहे. उपाययोजनांचा अभाव आणि जलनिचऱ्याची अपुरी क्षमता ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात.
रस्त्यांच्या बाबतीतही चित्र समाधानकारक नाही. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी या मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, जुना मुंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. काही ठिकाणी फेरीवाले, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरच होणारी भाजीविक्री यामुळे प्रवास अधिकच कोंडीत अडकतो. कल्याणीनगर परिसरातील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
माजी लोकप्रतिनिधींच्या मते, प्रभागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, पार्किंग, सांस्कृतिक हॉल आणि स्वच्छतागृहे उभारण्यात आली.
काही ठिकाणी १०० टक्के विद्युत तारा भूमिगत केल्या असून ड्रेनेजची कामेही पूर्ण झाल्याचा दावा केला जातो.
भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा सुधारल्याने प्रभाग स्पॉट
टँकरमुक्ती शक्य झाली. तरीही लोकसंख्येचा वेग आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ड्रेनेजची क्षमता वाढवणे, नाले-नद्या स्वच्छ ठेवणे आणि पूरनियंत्रणाची ठोस यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
नागरिकांकडून अपेक्षा स्पष्ट आहेत- अत्याधुनिक रुग्णालय, पालिकेची दर्जेदार इंग्रजी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय, तसेच अॅमिनिटी स्पेसचा प्रत्यक्ष विकास. भटक्या कुत्र्यांची समस्या आणि कचरा व्यवस्थापनही आव्हानच आहे.
कामांचा लाभ टिकवण्यासाठी, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन, आणि सातत्यपूर्ण देखरेख गरजेची आहे.
दरवर्षी पावसाळा आला की हरीनगर, सैनिकवाडी उज्ज्वल उपाय नको, कायमस्वरूपी पूरनियंत्रण हवे.
स्थानिक रहिवासी, हरीनगर
विकासकामे झाली असली तरी अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या आजही कायम आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नियोजन झालेले दिसत नाही.
– नागरिक, वडगाव शेरी
८८ जुना मुंढवा रस्ता आणि सैनिकवाडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक झाला आहे. रस्तारुंदीकरण रखडल्याचा फटका सर्वांनाच बसतो.
– वाहनचालक, कल्याणीनगर
नव्या रचेमध्ये प्रभाग तोडले
महापालिका निवडणुकीसाठी कल्याणीनगर-वडगाव शेरी या प्रभाग क्र. ५ ची एकूण लोकसंख्या ९१ हजार ३८१ आहे. २०१७ मध्ये वडगाव शेरीतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गणेशनगर भाग दोन प्रभागात तोडला होता. मात्र, आता पुन्हा नव्या रचनेमध्ये गणेशनगर, शाखीनगर, त्रिदलनगर आणि म. हौ. बोर्डचा हा भाग वडगाव शेरीमध्ये जोडला आहे.






