स्वागरेगट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला किती शिक्षा होणार? काय सांगतो कायदा?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दत्त गाडेला जन्मठेप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल पुणे क्राईम ब्रॉन्चने दत्ता गाडेवर आणखी ३ कलमांची वाढ केली. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेवर ‘पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे’ अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांची वाढ केली. हे अतिरिक्त कलम सिद्ध झाल्यास दत्ता गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
काल पुणे क्राईम ब्रॉन्चने दत्ता गाडेवरील कलमांची वाढ केली. पोलिसांनी गाडेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2) (M), 115 (2) आणि 127(2) या ३ कलमांची वाढ केली. यातील 64(2) (M) हा कलम जर सिद्ध झाला, तर दत्ता गाडेला एकाच महिलेवर वांरवार बलात्कार या गुन्हाच्या अंतर्गत दहा वर्ष ते आजीव जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
काल स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्याला पुणे न्यायालयासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दत्ता गाडेचा मोबाईल फोन अजूनही पोलिसांना सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे.
स्वागरगेट बस स्थानकात २६ तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवासी आहे. घटना घडल्यानंतर तो तीन दिवस फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकं धाडण्यात आली होती. अखेर त्याच्याच गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.
घटनेनंतर आरोपी दत्ता गाडे हा जवळपास तीन दिवस फरार होता. तो या काळात जवळपास तीस ठिकाणी लपला होता. या सर्व ठिकाणी पोलिसांनी आज तपास केला. फरारी असताना तो गावातील 7 व्यक्तींना भेटला होता, त्या व्यक्तीचा पोलिसांनी आज जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये एका ठिकाणी तो गॅरेजमध्ये गेला होता, एका ओळखीच्या व्यक्तीला जेवण मागितले, एका ठिकाणी पाणी पिला असे तो 7 वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटला या सर्व लोकांचे पोलिसांनी आज जबाब नोंदवले आहेत. गुणाट गावातील शेतशिवारात जवळपास 30 वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून दत्ता गाडे लपला होता. आरोपी दत्ता गाडेच्या घराची देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली. दरम्यान कोर्टात दत्ता गाडेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. मात्र कोर्टाने अखेर त्याच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.