accident
पुणे: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022) आज राज्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, अशातच एक बातमी समोर आली आहे. भोर येथून रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यांची मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळल्याची माहिती आहे.
[read_also content=”फुटीरतावाद्यांनी सुरक्षा प्रमुखांची कार उडवली, गॅस पाइपलाइनही फुटली; काल शाळेवर रॉकेट डागण्यात आले https://www.navarashtra.com/world/battle-trailer-in-ukraine-separatists-blow-up-security-chiefs-car-gas-pipeline-explodes-a-rocket-was-fired-at-the-school-yesterday-241265.html”]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. अशातच आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी, मोटरसायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळल्याचे समजते. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींची नाव केतन देसाई (वय 23), प्रथमेश गरुड (वय 25) आणि किरण सुर्यवंशी (वय 20) भोंगवली तालुका येथे सर्व राहणारे आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.
[read_also content=”स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील शिवरायाचं पहिलं मंदिर पाहिलतं का? https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/dinvishesh/shivjayanti/chhatrapati-shivaji-maharaj-temple-in-aurangabad-nrps-241281.html”]