शनिवारवाडा नमाज पठण प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
पुणे:
शनिवार वाडा नमाज पठणावरून रुपाली ठोंबरें मेधा कुलकर्णींवर संतापल्या
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी सातत्यांने पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्या खासदार आहेत हे त्या विसरल्या आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवण्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले, “शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा आणि सर्व पुणेकरांचा आहे. खासदार बाईंनी केलेल्या कृत्यामुळे पुण्यातील सौहार्द धोक्यात येत आहे. त्यांनी शनिवारवाड्यात केलेल्या नाटकावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनेही त्यांना आवर घालावा.”
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी पुण्यातील धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे. प्रार्थना असो किंवा दुवा — श्रद्धा एकच असते, हे त्या विसरल्या आहेत.” अशी टिका रुपाली पाटील यांनी केली आहे.