वाहनविक्रीत महाराष्ट्र अव्वल; एका वर्षात पाच लाखांहून अधिक विक्री
देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री झाली असून, प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात पाच लाख सहा हजार २५४ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे, एकूण विक्रीच्या ती ११.८ टक्के आहे. दुचाकी वाहनविक्रीत १०.७ टक्क्यांसह महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले आहे, तर तीनचाकी वाहनविभागात तिसरे स्थान मिळवले असल्याची अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ताज्या अहवालात दिली आहे.
फुल्ल टॅंकमध्ये 700 KM ची रेंज ! 67 हजार रुपये किंमत असणारी बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
व्यावसायिक वाहनांच्या विभागात, महाराष्ट्रात सर्वाधिक एक लाख ३४ हजार ४४ वाहने विकली गेली, त्यांचा वाटा १४ टक्के होता, उत्तर प्रदेशात ८९ हजार १२६ वाहनांची विक्री झाली, ९.३ टक्के हिश्शासह तो दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये ८२ हजार ४३३ वाहनांची विक्री झाली. एकूण विक्रीतील ८.६ टक्के हिश्शासह तो तिसऱ्या स्थानी आहे.
दुचाकी विभागात, उत्तर प्रदेश आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २८ लाख ४३ हजार ४१० वाहनांसह प्रथम स्थानावर असून, एकूण विक्रीतील हिस्सा १४.५ टक्के आहे. त्यानंतर महाराष्ट्राने २० लाख ९१ हजार २५० वाहनविक्रीसह १०.७ टक्के हिस्सा मिळवत दुसरे स्थान मिळवला आहे. तमिळनाडू १४ लाख ८१ हजार ५११ वाहनविक्रीसह ७.६ टक्के हिस्सा मिळवत, तिसऱ्या स्थानावर होता. प्रवासी वाहनविभागात चौथ्या स्थानावर असलेल्या कर्नाटकने १२ लाख ९४ हजार ५८२ दुचाकी वाहनांची विक्री करत, चौथे स्थान मिळवले, तर १२ लाख ९० हजार ५८८ दुचाकी वाहनांसह ६.६ टक्के हिस्सा नोंदवत गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.
Tata Altroz Facelift खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट? ‘असा’ असेल EMI चा संपूर्ण हिशोब
या यादीत उत्तर प्रदेश चार लाख ५५ हजार ५३० वाहनविक्रीसह दुसऱ्या स्थानावर असून, त्यांचा हिस्सा १०.६ टक्के आहे. गुजरात तीन लाख ५४ हजार ५४ वाहनांसह ८.२ टक्के हिस्सा मिळवत तिसऱ्या स्थानावर होते. कर्नाटक तीन लाख नऊ हजार ४६४ वाहन विक्रीसह ७.२ टक्के हिस्सा मिळवत, चौथ्या क्रमांकावर, तर दोन लाख ९४ हजार ३३१ वाहनांसह हरियाणा ६.८ टक्के हिस्सा नोंदवत पाचव्या क्रमांकावर होते.