Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…

राज्यनिहाय पाहता, गुजरातमधील ८५ टक्के जिल्हे 'मोठी तूट' या श्रेणीत होते. छत्तीसगडमधील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये गंभीर पावसाची कमतरता दिसून आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 02:35 AM
Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…
Follow Us
Follow Us:

शतकातील तिसरा सर्वाधिक कोरडा जून
७५ टक्के जिल्ह्यांत तुटीचा पाऊस
पावसाने घेतली मोठी विश्रांती

सुनयना सोनवणे /पुणे: जून २०२६ मध्ये नैऋत्य मान्सूनने देशाच्या बहुतांश भागात वेळेत प्रवेश केला. मात्र, मान्सूनचे आगमन आणि प्रत्यक्षात पडणारा पाऊस यात मोठी तफावत दिसून आली. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात देशातील तब्बल ७५ टक्के जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते १०० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला असून, हा जून गेल्या शंभर वर्षांतील तिसरा सर्वाधिक कोरडा जून ठरला आहे.

१ ते ३० जून २०२६ या कालावधीतील ७४१ जिल्ह्यांच्या विश्लेषणानुसार, २२३ जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट, तर ३३२ जिल्ह्यांमध्ये २० ते ५९ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला. म्हणजेच, एकूण ५५५ जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर तूट होती. याउलट, केवळ १८१ जिल्ह्यांमध्येच सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला.

राष्ट्रीय स्तरावर जून महिन्यात १५७.७ मिमी एवढा सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ९२.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे जून २०२६ हा २००९ आणि २०१४ नंतरचा शतकातील तिसरा सर्वाधिक कोरडा जून ठरला.

Monsoon Travel Alert: पावसाळी सहलीचा प्लॅन करताय? मग ‘या’ धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

पावसाची तूट सर्वाधिक मध्य भारतात (५९ टक्के) आढळली. सोयाबीन व कडधान्यांचे प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या या भागातील कमी पावसाचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. पूर्व व ईशान्य भारतात ४१ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २८ टक्के, तर उत्तर-पश्चिम भारतात २२ टक्के पावसाची तूट नोंदली गेली.

राज्यनिहाय पाहता, गुजरातमधील ८५ टक्के जिल्हे ‘मोठी तूट’ या श्रेणीत होते. छत्तीसगडमधील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये गंभीर पावसाची कमतरता दिसून आली. जगातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील ९१ टक्के जिल्ह्यांमध्येही पावसाची मोठी तूट नोंदली गेली.

तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचे आगमन म्हणजे जलसुरक्षेची हमी नाही. पाऊस कोठे, केव्हा आणि किती पडतो, यावर शेती, जलाशयांतील पाणीसाठा, भूजल पुनर्भरण, शहरांचा पाणीपुरवठा आणि अन्नधान्याच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे जून २०२६ ने केवळ पावसाचा नव्हे, तर देशाच्या जलसुरक्षेचा गंभीर इशारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

एकूण जिल्हे – ७४१
६०% पेक्षा अधिक तूट – २२३ जिल्हे
२० ते ५९% तूट – ३३२ जिल्हे
सामान्य किंवा अधिक पाऊस – १८१ जिल्हे
जूनमधील प्रत्यक्ष पाऊस – ९२.२ मिमी
जूनचा सरासरी पाऊस – १५७.७ मिमी

Web Title: Meteorological department 75 percent districts received 20 to 100 percent less rainfall rain monsoon weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Monsoon Alert
  • pune news
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली
1

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली

Maharashtra Rain Alert: थरकाप उडणार! दुष्काळाचे संकट? कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह…
2

Maharashtra Rain Alert: थरकाप उडणार! दुष्काळाचे संकट? कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह…

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज
3

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा
4

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.