Eknath Shinde News: ओतूर आणि नारायणगाव नगरपंचायतीला लवकरच मंजुरी एकनाथ शिंदे
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा असली, तरी कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि निवडणुकीच्या रणांगणात त्यांना बळ देणे गरजेचे असल्याने ही सभा घेतल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे विधान करताना शिंदे म्हणाले, “मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. कष्टकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल, लाडक्या बहिणींना लखपती झालेले पाहणे हेच आमचे स्वप्न आहे. “पर्यटन वाढल्यास येथील तरुणांना रोजगारासाठी पुणे किंवा मुंबईकडे स्थलांतर करावे लागणार नाही. ओतूर आणि नारायणगाव येथे नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी आपल्या खात्याशी संबंधित असल्याने ती तातडीने मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. PUNE POLITICS
जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक केले, “तुमचा आमदार मध्यरात्रीही बिबट्याच्या प्रश्नावर मला फोन करतो. लोकांचे जीव जात असताना आम्ही गप्प बसणार नाही. बिबट सफारीसाठी ८० कोटींचा निधी दिला असून, रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून ही दहशत कायमची संपवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ऑडिओ संदेश सभेत ऐकवण्यात आला. “जुन्नरमध्ये एमआयडीसी (MIDC) आणली जाईल. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष करून दाखवतो. आचारसंहिता संपताच कामाला सुरुवात होईल,” असा संदेश त्यांनी दिला. तसेच रानडुकरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
काही लोक फक्त फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न आहेत, पण आम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे आहोत, विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र त्यासठी जिल्हा परिषदेत आपला हक्काचा माणूस असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले, सभेच्या शेवटी त्यांनी उपस्थितंना आवाहन केले की, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर दैत्या तारखेस धनुष्यागाच्या विनासमोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, या जाहीर सभेमुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ताथले असून, महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंवालन निवेदक गणेश मोढवे यांनी केले. तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख योगेश (बाबू) पाटे यांनी केले.






