Photo Credit- Social Media (प्रशांत जगताप की चेतन तुपे? हडपसरच्या जनतेचा कल कुणाला)
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. ज्या जागांसाठी उमेदवार जाहीर झाले आहेत. तेथे उमेदवारांनी आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. त्यातच हडपसर विधानसभा मतदारसंघात आघाडीतील मित्र पक्षांच्या माजी मंत्र्यांनी आणि माजी आमदारानेच आव्हान दिले आहे. त्यामुळे पुण्यात सध्या हडपसर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा रंगली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहे. हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन विठ्ठल तुपे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यावेळीही चेतन तुपे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पण हडपसरचा राजकीय इतिहासही वेगळाच आहे.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये ‘मेड इन इंडिया’ ॲनिमेशनच्या यशाचा गौरव; म्हणाले
2008 मध्ये परिसीमनानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत याठिकाणी तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.ह
2019: चेतन विठ्ठल तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस
2014: योगेश टिळेकर, भारतीय जनता पार्टी
2009: महादेव बाबर, शिवसेना
हेही वाचा: पंढरपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद मिटला; ‘या’ दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात प्रदेशाध्यक्ष
हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 पासून अस्तित्वात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार येथे एकूण 5 लाख 4 हजार 259 मतदार आहेत. येथे अनुसूचित जाती मतदारांची संख्या अंदाजे 73,779 आहे जी 15.82 टक्के आहे. त्याच वेळी, आदिवासी मतदारांची संख्या 4,011 आणि मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 88,144 म्हणजेच 18.9 टक्के आहे.
यावेळी हडपसर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांशी भिडणार आहेत. 2019 मध्ये येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चेतन तुपे अजित पवारांच्या गोटात आहेत. यावेळी अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जनता कोणाची बाजू घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.