पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजला ठोकले टाळे; १६५० विद्यार्थ्यांच भवितव्य अंधारात
भोरमधील इंजिनिअरिंग कॉलेजने थकबाकी न भरल्यामुळे बँकेने कॉलेजचा ताबा घेतला आहे. वसतीगृहातील ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढून न्यायालयाच्या आदेशानुसार कॉलेजचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात असून पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यानया प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आता…
पुण्यातील भोर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर वडवाडी येथे अभिनव एज्युकेशन सोसायटीचं इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. कॉलेजची इमारत आणि १४ हेक्टर परिसरात हे कॉलेज आहे. बँक ऑफ बडोदाची ३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कॉलेज प्रशासनाने ही थकबाकी वेळेत न भरल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून कॉलेजला टाळे ठोकले आहेत.
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास ८०० विद्यार्थी होते. त्यांनाही बँकेने बाहेर काढत सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. या कारवाईमुळे डिप्लोमा आणि डिग्री शाखांमधील एकूण १६५० विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग ॲड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या सहा शाखा, डिग्रीच्या पाच शाखा आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
महिला सरपंचाला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी; परळीनंतर आता भिगवणमध्ये वातावरण तापलं
याच महिन्यात इंजिनिअरिंगच्या परीक्षा आहे. अशा परिस्थितीत १७ जानेवारी रोजी इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा होणार ? यापुढे शिक्षण बंद होणार का? असा प्रश्न विद्यार्थांना सतावरत असून काही विद्यार्थी डोळ्यात अश्रू घेऊन हॉस्टेलच्या बाहेर पडले. २००९ पासून सुरू असलेल्या या महाविद्यालयात महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. सद्यस्थितीत ४. १९,000 हजार स्वेअर फूटाचे बांधकाम असून कॉप्युटर व इतर साहित्य मिळून सुमारे १०० कोटींची मालमत्ता आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वडवाडी कॅपसमध्ये सध्या जमीन आणि कॉलेजच्या इमारती मिळून सुमारे १३२ कोटींची मालमत्ता आहे, असी बातमी सामने दिली आहे.