तिन गटात ही सायकल रॅली सोडण्यात आली. ह्यामध्ये लहान मुलाचा गट लोणावळा नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, ठोंबरेवाडी, सिद्धार्थनगर व पुन्हा नगरपरिषद कार्यालय ह्या मार्गाने सोडण्यात आला. त्यानंतर महिला व मुलींचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, पुढे रायवुड व भुशी धरण मार्गे आयएनएस शिवाजी गेट व पुन्हा नगरपरिषद कार्यालय तर पुरुष व युवकाचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, कुमार चौक, मिनू गॅरेज मार्गे डॉन बॉस्को, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, भांगरवाडी मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालय असा सोडण्यात आला.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती रचना सिनकर , नगरसेवक श्रीधर पुजारी, सुधिर शिर्के, भाजपाचे गटनेते देविदास कडू, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, ललित सिसोदिया, माजी नगरसेवक विशाल पाडाळे यांच्यासह लोणावळा सायकल क्लबचे सदस्य, शिवदुर्ग मित्र, लायन्स क्लब, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघ, जेष्ठ नागरिक संघ आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
रॅलीच्या समारोप प्रसंगी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि लोणावळा शहराच्या ब्रँड अॅम्बेसिडर आयेशा झुल्का या उपस्थित होत्या. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचा वतीनं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, निबंध स्पर्धा, वॉल पेंटिंग, शॉर्ट मुव्ही आदी स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. तद्नंतर लोणावळा नगरपरिषद ते ट्रायोज मॉल आणि परत लोणावळा नगरपरिषद या मार्गावर प्लॉग ओ थॉन रनचे आयोजन करण्यात आले होते. या रन मध्ये रस्त्याने धावताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो जमा करण्यात आला. सुमारे २०० विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.






