काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत
महाविकास आघाडीचे जागावाटपासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाना पटोले आणि ठाकरे गटातील मतभेद टोकाला गेले हाेते. हा वाद अक्षरश: दिल्ली हायकमांडपर्यंत पोहचला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जागांवाटपाची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्तिच झाले होते. पण विदर्भातील काही जागांसाठी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. पण बाळासाहेब थोरांतांकडे जागावाटपाची जबाबदारी सोपवल्यानंतर आज उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.
हेही वाचा:भारतापासून केवळ 4 तासांच्या अंतरावर आहे हे सुंदर बेट, प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही
दरम्यान, काँग्रेस उमेदवारांची यादी आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात काल दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिलालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम जागावाटप जाहीर केले जाईल. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात समन्वयक असतील, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आज महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब थोरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
हेही वाचा:ऑक्टोबरच्या पावसामुळे कांदा सडला; शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान