पुणे महानगरपालिका (फोटो- सोशल मिडिया)
पुणे/महेंद्र बडदे: कचरा प्रकल्पाला विराेध करण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी जागा शाेधण्याचे आव्हानच महापािलका प्रशासनासमाेर आहे. त्याचवेळी कचरा प्रक्रीया प्रकल्पामुळे हाेणारे भुजल प्रदुषण राेखणे, दुर्गंधी कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कचऱ्यावरील प्रक्रीयेसाठी महापािलकेला करावा लागणार आहे.
शहरातील कचरा प्रश्न हा सातत्याने पुढे येत असताे. महापािलकेकडून सातत्याने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्याचे आवाहन केले जाते. शहरात निर्माण हाेणारा कचरा गाेळा करून त्यावर प्रक्रीया करण्यासाठी विविध भागांत प्रक्रीया प्रकल्प उभे केले आहेत. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, ई वेस्ट, बांधकाम राडा राेडा, वैद्यकीय कचरा अशा विविध स्वरुपाच्या कचऱ्याचा समावेश अाहे. ज्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येईल अशा कचऱ्याचा पुनर्वापर केला जात आहे. कचऱ्यापासून बाॅयाेगॅस, सीएनजी देखील तयार केले जात आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रीया उभे केले आहेत. परंतु , स्थानिक रहीवाश्यांकडून कचरा प्रक्रीया प्रकल्पांना विराेध करण्याचे प्रमाण वाढले आहे.
काेथरुड नंतर उरुळी देवाची , फुरसुंगी
पुर्वी शहराच्या बाहेर असल्याने काेथरुड येथे कचरा डेपाे हाेता. त्याची क्षमता संपल्याने उरुळी देवाची – फुरसुंगी येथे कचरा डेपाे केला गेला. स्थानिकांकडून हाेणाऱ्या विराेधामुळे या दाेन्ही ठिकाणी कचरा टाकणे बंद केले गेले, परंतु तेथे साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावली जात अाहे. उरुळी देवाची अािण फुरसुंगी येथील कचरा प्रकल्पाचे प्रकरण न्यायालयात गेले हाेते.
विविध ठिकाणी हाेताेय विराेध
सुस येथील कचरा प्रकल्प स्थलंातरीत करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यंानी अांदाेलनाचा इशारा दिला. सत्ताधारी पक्षाकडून विराेध झाल्याने अाता महापािलका प्रशासनासमाेर अडचण उभी झाली अाहे. केवळ सुस येथीलच नाही तर अांबेगाव, सुुखसागर नगर, केशवनगर, हडपसर रॅम्प, धानाेरी या िठकाणी असलेल्या कचरा प्रक्रीया प्रकल्पांना नागरीकांकडून विराेध केला जात अाहे. त्यासाठी वेळाेवेळी अांदाेलने केली गेली अाहेत.
शहरात प्रतिदिन तेवीसशे ते चाेवीसशे टन इतका कचरा निर्माण हाेताे. या कचऱ्यावर महापालिकेच्या २२ प्रकल्पांत प्रक्रीया केली जात अाहे. अाग लागल्याने दाेन प्रकल्प बंद अाहेत, तर दाेन प्रकल्पांचे काम सुरु अाहे. सुका अािण अाेला कचऱ्यांवर प्रत्येकी अकरा प्रकल्प कार्यानि्वत अाहेत. या कचरा प्रक्रीया प्रकल्पांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापािलका सैदव तयार अाहे. त्यादृष्टीने प्रयत्न सातत्याने केले जात अाहेत.
– संदीप कदम, उपायुक्त – घन कचरा व्यवस्थापन, पुणे महापालिका