सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी महापालिकेच्या सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, सल्लागार डॉ. संजय नाईक, कार्यकारी अभियंता सुनील पवार, संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते, कनिष्ठ अभियंता प्रणिता पिंजन आदी उपस्थित होते.
निगडीतील अपघातांची पुनरावृत्ती टाळा
पाहणीदरम्यान बारणे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “यापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाचा उतार तीव्र झाल्याने तिथे सातत्याने भीषण अपघात होत आहेत. तीच चूक रक्षक चौकात होताना दिसत आहे. सल्लागार आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाची लांबी वाढवून हा उतार तातडीने कमी करण्यात यावा.” या कामाचा खर्च, तांत्रिक माहिती आणि आराखड्याचा फेरविचार करून तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यानंतर सांगवी फाटा ते रावेत दरम्यानचा प्रवास सिग्नलविरहित होणार असून इंधन आणि वेळेची बचत होईल. मात्र, ‘विकासासोबत सुरक्षा’ महत्त्वाची असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.
पुलाची वैशिष्ट्ये आणि सुविधा :
लांबी व रुंदी : ३४५ मीटर लांब आणि २६.४ मीटर रुंद.
उंची : ५.५ मीटर.
स्वतंत्र मार्ग : पिंपळे निलखकडून येणाऱ्या वाहनांसाठी खालच्या बाजूने स्वतंत्र मार्ग.
लष्करी वाहतूक : सैन्य दलाची वाहने आणि पीएमपीएमएल बससाठी पुलाखाली विशेष सोय.
उपाययोजना न केल्यास परिणामांना तयार राहा
“पुलाचा उतार तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्यास तो तातडीने दुरुस्त करा. योग्य संकेतचिन्हे आणि उपाययोजना न करता पूल खुला केल्यास परिणामांना तयार राहा,” असा स्पष्ट इशारा खासदार बारणे यांनी यावेळी दिला.
हे सुद्धा वाचा : पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त






