• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Purandar Airport Notification Finally Released By Midc Marathi News

Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत समोर आली मोठी बातमी: MIDC ने जाहीर केला ‘हा’ निर्णय

पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर २०१६ मध्ये केली होती. परंतु, त्याला सुरुवातीपासून विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2025 | 10:45 PM
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत समोर आली मोठी बातमी: MIDC ने जाहीर केला ‘हा’ निर्णय

पुरंदर विमानतळ प्रकल्प (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे.: गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित असून, तो अखेर संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार विमानतळासाठी ठरल्याप्रमाणे सात गावांमधील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

 विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील एकूण २ हजार ८३२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करणे गरजेचे होते. त्यानुसार उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले आहे. या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, रस्ते, पाणंद, ओढा या जागाही संपादित केल्या जाणार आहेत.

 सर्व सात गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, या जमिनींवर एमआयडीसीचे शेरे मारण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत एमआयडीसी व महसूल विभागाच्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याबाबत हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी असेल. त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. पुणे लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून, पुण्यासाठी स्वातंत्र्य असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यता आहे. त्यानुसार आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली.

विमानतळाचे एक पाऊल पुढे..

पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर २०१६ मध्ये केली होती. परंतु, त्याला सुरुवातीपासून विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली होती. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या जागी विमानतळ होईल, हे घोषित करून पुढील पाच वर्षांत विमानतळ पूर्ण करण्याचे ठरविले. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे.

Purandar: पुरंदरमधील विमानतळ प्रकल्पाबाबत सरकारचे एक पाऊल पुढे; शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?

राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, तात्काळ भूसंपादन प्रक्रिया सुरु केली जाईल. त्यासाठी भूंसपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती आज सोमवारी केली जाईल.   – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी पुणे.

गावाचे नाव क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वनपुरी – ३३९

कुंभारवळण – ३५१

उदाची वाडी – २६१

एखतपूर – २१७

गुंजवडी – १४३

खानवडी – ४८४

पारगाव – १०३७

एकूण २८३२

Web Title: Purandar airport notification finally released by midc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Purandar
  • Purandar Airport

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buddharoid: विज्ञानाच्या जगात अध्यात्माचा शिरकाव; जपानने तयार केला ‘यांत्रिक भिक्षू’ जो करणार सर्वच शंकांचे निरसन

Buddharoid: विज्ञानाच्या जगात अध्यात्माचा शिरकाव; जपानने तयार केला ‘यांत्रिक भिक्षू’ जो करणार सर्वच शंकांचे निरसन

Feb 25, 2026 | 04:00 PM
Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष

Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष

Feb 25, 2026 | 03:58 PM
मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Feb 25, 2026 | 03:53 PM
BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Feb 25, 2026 | 03:52 PM
Maharashtra News : निजामकालीन शेतरस्ता गायब; बनावट नकाशाने रस्ता केला गायब? ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

Maharashtra News : निजामकालीन शेतरस्ता गायब; बनावट नकाशाने रस्ता केला गायब? ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

Feb 25, 2026 | 03:51 PM
Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

Feb 25, 2026 | 03:43 PM
BMC Financial Reserves: ठाकरे गटाचा आरोप ठरला खरा? मुंबई पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय

BMC Financial Reserves: ठाकरे गटाचा आरोप ठरला खरा? मुंबई पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय

Feb 25, 2026 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.