स्मार्ट सिटीमुळे मत्यचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वसई, जिप्र. वसई (Vasai) विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत. त्याचबरोबर अपघातही घडत असल्याचे नालासोपाऱ्यातील एका घटनेने समोर आले आहे. या घटनेत सायकलवरून जात असलेली २ छोटी मुले तब्बल १५ फूट खोल खड्डयात पडली. सुदैवाने दुखापतीवर त्या मुलांचा जीव वाचला, वसई विरार शहरात विविध ठिकाणी एसटीपी प्लांटसाठी मलवाहिनी जोडणाऱ्यांची कामे सुरु आहेत.
नालासोपारा पूर्वेकडील दुबे कॉलेज यामुख्य रस्त्यावर दिवस-रात्र काम खोदकाम करून मलवाहिनी जोडण्याचे काम सुरू असून ५ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास २ लहान मुले सायकल घेऊन जात असताना कोणतीही बॅरिकेट्स न लावल्याने याठिकाणी असलेल्या १५ फूट खोल खड्चात पडली. सुदैवाने किरकोळ जखमेवरच निभावले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. परिवर्तन लढा सामाजिक संस्थेच्या कार्यालयासमोरच काम सुरु असून त्याचठिकाणी हो घटना घडल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशांत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली.
Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?
इमारतींमधील सेफ्टी टैंक बंद करून इमारतीमधील मल मलवाहिनीतून थेट एसटीपी प्लांटमध्ये वाहून नेण्यासाठीचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्वाला मशिनरी दिवस-रात्र सुरु असून खोदकामामुळे जुन्या इमारतीला अक्षरशः हादरे बसत आहेत. हाद-यऱ्यांमुळे इमारतीमधील रहिवाशी देखिल भितीच्या छायेखाली असल्याचे म्हणणे आहे. याहादऱ्यामुळे इमारती धोकादायक स्थितीत जाण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.
प्लांटसाठी मलवाहिनी जोडण्याचे काम करताना रस्त्यात तब्बल पंधरा फूट खोल खड्डा करावा लागतो. मलवाहिनी जोडल्यानंतर खड्डा बुजवून रस्त्याची पुर्नबांधणी करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून निविदेतच तशी तरतूद आहे. महापालिका अधिकारी, अभियंता याकडे कानाडोळा करत असल्याने ठेकेदार प्रशासनावे साटेलोटे असल्याने मोठा गैख्यवहार सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






