भरत गोगवाले यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; म्हणाले भविष्यातील पिढ्यांसाठी...
कर्जत/संतोष पेरणे: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात शिवप्रेमींचा उत्साह पाहण्यास मिळाला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने भरत गोगावले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. गावकऱ्यांशी संवाद साधताना भरत गोगावले म्हणाले की, पाषाणे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला आहे.ही आमच्या सारख्या छत्रपतींचे विचार सोबत घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिक यांच्यासाठी प्रेरणा देणारी बाब आहे असे गौरोद्गार राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी काढले.
कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील कार्यकर्ते तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उभारणी करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पाषाणे गावी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते झाले.त्यावेळी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना पक्षाचे सह सचिव एकनाथ शेलार,कर्जत मतदारसंघाचे संघटक शिवराम बदे,तसेच तालुका खजिनदार उत्तम शेळके,उप तालुका प्रमुख भरत डोंगरे,प्रशांत झांजे, भरत हाबळे,रामचंद्र बदे,भानुदास राणे आदींसह आयोजक राहुल विशे आदी उपस्थित होते.
नामदार भरत गोगावले यांनी पाषाणे गावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारून शिवप्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले आहे.त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे न्यावा असे आवाहन केले.तर आमदार महेंद्र थोरवे यांनी पाषाणे गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिव शंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारसा याची साक्ष देणारी ठरणार असे कुटिल केले.भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल. शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही. आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले.
दरम्यान या बरोबरच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार भाऊसाहेब राऊत यांच्या १२१व्या जयंती सोहळ्याचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते.या सोहळ्यात इतिहासाचे अभ्यासक वसंत कोळंबे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
महापुरुष जयंती समिती कर्जत,हुतात्मा हिराजी पाटील मंडळ चांदई आणि पिपल्य पब्लिकेशन यांच्या माध्यमातून आणि लेखक वसंत कोळंबे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथ यांचे प्रकाशन सोहळा कर्जत येथील महिला मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी भाऊसाहेब राऊत यांचे नाती डॉ मिलिंद राऊत,वक्ते पद्मश्री आण्णासाहेब जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस, भाऊसाहेब राऊत यांचे नातू राहुल तिटकारे,माथेरानच्या माजी उप नगराध्यक्ष डॉ शर्मिला राऊत,लेखक घनश्याम डांगरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड,विद्यालय कशेले येथील मुख्याध्यापक एस एस प्रधान,डिकसळ येथील विद्यालयाचे मुख्याध्यापकललिता राणे, आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत महापुरुष जयंती उत्सव समिती कडून अध्यक्ष भगवान धुळे, दीपक भालेराव, सुनील कोळंबे,दिलीप लोभी, शिवाजी कोळंबे,देविदास कोळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्रास्ताविक हावरे यांनी तर सूत्रसंचालन विजय कोंडिलकर यांनी केले.