कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आंबिवली फाटक ते दामत फाटक या दरम्यान जोडणारा रस्ता काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण यांच्या प्रतीक्षेत आहे.या रस्त्याचे मजबुतीकरण झाले. नेरळ गावातील वाहतूक कोंडी होण्याची समस्या कायमची मिटली जाईल.मात्र कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांचे आंबिवली फाटक ते दामत फाटक हा पेशवाई रस्ता तयार करण्याकडे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
कल्याण कर्जत रस्त्यावरील माणगाव येथून आंबिवली गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक असून तेथून भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याकडे तसेच नेरळ कोल्हारे साई मंदिर नाका आणि पुढे दामत फाटक असा रस्ता आहे. पेशवे कालीन हा रस्ता असल्याने या रस्त्याला पेशवाई रोड म्हणून ओळखले जाते.कल्याण कर्जत रस्त्याने आंबिवली फाटक ते दामत फाटक हा रस्ता पुढे कल्याण कर्जत रस्त्याला जावून मिळतो.त्यामुळे हा रस्ता शासनाने तयार केल्यास त्याचा फायदा नेरळ गावातील वाहतूक कोंडी संपुष्टात आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.हा रस्ता नेरळ गावात कोणत्याही प्रकारचे काम नसलेली परंतु कर्जत किंवा कल्याण कडे जाणारी वाहने ही नेरळ गावात न जाता थेट बाहेरचे बाहेर निघून जाऊ शकतात. त्यामुळे नेरळ येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा रस्ता मजबुतीकरण केल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊ शकते.
या पेशवाई रस्त्यावर आंबिवली फाटक ते बोरले गावापर्यंत रस्त्यावर किमान दीड दोन फूट खोल आणि आकाराने दहा ते पंधरा फूट आणि त्याहून अधिक लांबीचे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या शॉर्ट कट मार्ग असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कोणतेही वाहन ये जा करीत नाही.तर बोरले येथून चांगल्या प्रतीचा रस्ता असून हा चांगला रस्ता कोल्हारे ग्रामपंचायत हद्द संपेपर्यंत सुस्थितीत आहे. त्यानंतर हा नाल्यापासून दामत फाटक या भागापर्यंत पुन्हा एकदा मोठ मोठे खड्डे यांचा राहिला आहे.त्यामुळे या रस्त्याने दामत फाटक या रस्त्याने जाणारी वाहनांची संख्या अत्यल्प आहे.तर आंबिवली फाटक या भागातील रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या अत्यल्प आहे.हा रस्ता डांबरीकरण करून चांगल्या स्थितीत असता तर वाहने यांची वाहतूक सुरू होऊ शकते.याच रस्त्याने शासनाने काँक्रीटीकरण केल्यास आंबिवली फाटक ते दामत फाटक हा रस्ता वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होऊ शकतो.
खासदार,आमदारांची उदासीनता
कर्जत तालुक्यातील वाहतूक कोंडीचे महत्वाचे ठिकाण म्हणून नेरळ रेल्वे फाटक ओळखले जाते.त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आंबिवली फाटक ते दामत फाटक हा रस्ता शासनाने काँक्रीटीकरण करून नव्याने बनवावा अशी मागणी सातत्याने होत असते.मात्र मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार आणि कर्जत मतदारसंघाचे आमदार यांच्याकडून या रस्त्यावर एकदाही प्रयत्न झालेला नाही.त्यामुळे वाहनचालक यांच्या कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.