फोटो सौजन्य: गुगल
राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी म्हणजे निसर्गाने नटलेलं ठिकाण म्हणजे माथेरान. गेले काही दिवस माथेरान वेगळ्याच कारणांनी चर्चेत येत आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. तसंच पर्यकांची लूट देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हे सगळे प्रकार वेळीच बंद करा अन्यथा माथेरान बंद करु असा इशारा पर्यटन समितीने स्थानिकांना दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पुणे, मुंबई,नाशिक आणि रायगड येथील बरेच पर्यटक फिरण्यासाठी माथेरानची निवड करतात. मात्र सध्या पर्यटानाला गालबोल लागल्याचं चित्र दिसत आहे.
माथेरान शहरात येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढत आहेत. याचपार्श्वभूमीवर शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.या ठिकाणी येणारे पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माथेरान पर्यटन बचावसमिती कडून या पर्यटक फसवणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. माथेरान बचाव समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात माथेरान येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासी देखील आक्रमक झाले असून जंगल बचाव , आदिवासी बचाव अशी भूमिका आदिवासी संघटनेने घेतली आहे.
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून योग्यतेपेक्षा जास्त टॅक्सी भाडे घेत असल्याची तक्रार पर्यटकांनी केली आहे. त्याचबरोबर पर्यचकांच्या या तक्रारीची दखल घेत पर्य़टन समिती स्थानिक व्यावसायिकांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा यावेळी समितीने दिला आहे.
माथेरानमध्ये दिवसेंदिवस स्थानिक व्यापाऱ्यांची मुजोरी चालत असल्याचा आरोप पर्यटकांकडून होत आहे. टॅक्सी नाकारणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी स्वारांच्या गाड्य़ांच्या टायरची हवा काढण्य़ात येते. पहिल्यांदा येणाऱ्या पर्यकांची दिशाभूल केली जाते अशी तक्रार पर्य़टकांकडून वारंवार केली जात आहे. या सर्व प्रकारांमुळे माथेरानच्या पर्यटनावर गंभीर परिणाम होत असल्याचं माथेरान पर्यटन बचाव समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी यात हस्तक्षेप करून अशा गैर प्रकारांना वेळीच रोखता यावं यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे.माथेरान पर्यटन बचाव समितीच्या निवेदनात दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या दरम्यान व्यवसाय करणारे आदिवासी लोकांचे स्टॉल हटविण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
समितीच्या या तक्रारीनंतर स्थानिकांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माथेरान बचाव समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासी देखील आक्रमक झाले असून “जंगल बचाव; आदिवासी बचाव” अशी भूमिका आदिवासी संघटनेने घेतली आहे. शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या असून त्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. त्यात माथेरानचे डोंगरात राहणारे लोक हे मुलवासी आहेत.असे असताना देखील आदिवासी लोकांच्या विषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणारे माथेरान पर्यटन बचाव समिती यांच्या विरुद्ध आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.
आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आदिवासी समाज हा डोंगर पट्ट्यात राहत असून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार करतात.त्यामुळे आदिवासी कार्यक्रर्त्यांनी जंगल बचाव आदिवासी बचाव असा नारा दिला आहे. त्यामुळे आता पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून प्रशासन नेमकी काय ठोस पाऊलं उचलणार हगे पाहणं महत्वाचं आहे.






