Photo Credit- Social Media AIच्या वापरातून उत्पन्न वाढवण्यासाठी सहा पिकांची निवड; अजित पवार
अमोल तोरणे, बारामती: बारामतील नागीनगर क्याल श्री छत्रपती नवराष्ट्र सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून सध्या अडचणीत असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर आहे. कारखान्याची सध्याची स्थिती पाहता छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती कारखान्यासाठी तळमळ असणाऱ्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५०० हून अधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखारी घेण्याची मुदत ५ मे पर्यंत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजामाई करत त्यांना सलग पाच वर्ष छत्रपती कारखान्याची धुरा हाती देण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी ही घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक हे तीन नेते या निवडणुकीसाठी एकत्र येऊन इच्छुकांची चाचपणी ते करत आहेत.
पृथ्वीराज जाचक अध्यक्षपदासाठी योग्य, सभासदांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल मधून इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती गुरुवारी (दि २५) उपमुख्यमंत्री पवार व क्रीडा मंत्री भरणे हे घेणार आहेत. दरम्यान छत्रपती कारखान्याच्या भवितव्यासाठी कारखाना प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले पृथ्वीराज जाचक हेच अध्यक्षपदासाठी योग्य ठरतील, असा विश्वास सभासदांना आहे. याच पार्श्वभूमीवर आपले राजकीय मतभेद विसरून अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजमाई केली आहे.
बिनविरोध होण्याची शक्यताही कमीच नुकत्याच झालेल्या ऊस गळीत हंगामात छत्रपती कारखान्याचे ऊस गाळप फार कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना बसला आहे. त्यामुळे कारखान्याचा तोटा वाढला आहे. अनेक दिवसांपासून छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीत आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील ५४ गावांचा आधारवड असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली होती. संपूर्ण राज्यात सहकारातील एक आदर्श कारखाना म्हणून पाहिल्या जाणाऱ्यार छत्रपतीर ची अवस्था सध्या अडचणीची आहे. निवडणूक बिनविरोध व्यवी, असे देखील अनेकांचे मत आहे. मात्र इच्छुकांची मोठी संख्या पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
भाजपामधील नेत्यांचा विरोध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी करण्याच्या भूमिकेला भाजप नेते तानाजीराव थोरात व अविनाश मोटे यांनी विरोध करून निवडणूक पूर्ण ताकतीने समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर जिजामाता ऊस उत्पादक संघटनेचे प्रमुख सुनील काळे यांनी देखील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विद्यमान संचालकांमध्ये अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह अनेक संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. अनेक नवे चेहरे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.