मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त होत आहे. तसेच, राजकीय पक्षांचे नेतेही हा महाराष्ट्राचा (Maharashtra) आणि मराठी माणसाचा अपमान (Insult Of Marathi) असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही संताप व्यक्त केला आहे.
आपल्याला माहित नसेल तर महाराष्ट्राबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद (Post Of Honor) आहे म्हणून आपल्या विरुद्ध बोलायला कचरतात. परंतु, आपल्या विधानांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाने येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत? दुसरीकडे त्यांना असे वातावरण मिळेल का?. असा प्रश्न राज यांनी केला आहे.
“मराठी माणसाला डिवचू नका!” pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून वातावरण करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका. इतकंच आता आपल्याला सांगतो, असा सज्जड इशारा राज यांनी पत्राद्वारे दिला आहे.