नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) गुरुवारी झालेल्या महाप्राबोधन मेळाव्याला (Mahaprabodhan Melava) तुफान प्रतिसाद मिळाला. यावेळी खा. अरविंद सावंत (Arvind Sawant), सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. यावेळी शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे देखील मागे राहिले नाहीत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलिसांच्या खांद्यावर बंदूक न ठेवता समोरासमोर येऊन लढण्याचे आव्हान केले. अन्यथा पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल त्यासाठी रस्त्यावर देखील उतरू असा इशारा खा. विचारे यांनी दिला.
शिंदे गटात येण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फोन करतात. नाही गेले तर खोट्या केसेस लावून; पोलिसांच्या मार्फत नोटीस देण्यात येतात. काहींना तडीपार करण्यात आले काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तुमच्या हिंमत असेल तर समोर समोर या ना. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशाला त्रास देता, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गुरुवारी झालेल्या मेळाव्यात दिले.
“नवी मुंबईत शिवसेनेचा एक आठवड्यापूर्वी मेळावा झाला होता. तो मेळावा यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या मनात पोटशूळ उठला आहे. मेळाव्याला उपस्थित असलेल्यांचे जुन्या केसेस काढल्या जात आहेत. शिंदे गटात येण्यासाठी धमकी दिली जात आहे. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,” असे राजन विचारेंनी ठणकावलं आहे.
“कोणाला त्रास देत आहे…” “एम. के. मडवी यांना तडीपार केलं आहे. उपजिल्हाप्रमुखावर सुद्धा केसेस दाखल केल्या आहेत. दिघ्यातील मेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल शिवसैनिकांना नोटीस देण्यात आल्या. काय चालवलं आहे, कोणाला त्रास देत आहात तुम्ही. तुमच्यात हिंमत असेल तर, समोरा समोर या ना. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना कशाला त्रास देता. पोलिसांना पोलिसांचे काम करु द्या. पोलिसांनी असाच अन्याय सुरु ठेवला तर रस्त्यावर यावे लागेल, मग कोणीच थांबवू शकत नाही; असा इशारा राजन विचारेंनी दिला.