सातारा : गेल्या १२-१३ वर्षापासून राजे प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना, समाजामध्ये आमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने, राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच समाजाचे हिताकरीता झटणाऱ्या, राजे प्रतिष्ठानचे सेवा भावी आणी निस्वार्थी कार्यकर्त्यांची नवीन कार्यकरिणी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस सातारा येथून दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या पत्रकात पुढे नमुद करण्यात आले आहे की, समाजाच्या सुख-दुखःशी एकरुप होवून, कोणत्याही प्रकारे कोणावरही अन्याय होवू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार्याु निस्वार्थी तरुणांची आणि अनुभवी व्यक्तींची संघटना म्हणून राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ही सामाजिक संघटना महाराष्टभर ओळखली आहे. आमच्या अधिपत्याखाली अनेक छोटे मोठे उपक्रम राजे प्रतिष्ठानच्या वतीने पश्चिमम महाराष्ट्रात आणि राज्यात राबविले गेले आहेत.
अनेकांना मदतीचा हात देताना, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा प्रामाणिक उद्देश या संघटनेच्या स्थापनेमागे आमचा राहीला आहे. राजे प्रतिष्ठानची कार्यकारीणीमधील बदल लवकरच करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.