"औकातीवर आले, खरे रुप दाखविले...", राजू पाटील यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील भाजपच्या एका महिला पदाधिकारीने एक ट्वीट केले. ज्या ट्वीटनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी रिट्वीट करीत भाजपला धारेवर धरले आहे. औकाती आले, खरे रुप दाखविले… आत्ता राजू पाटील यांच्या ट्वीटनंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या शिवानी गोखले यांच्या ट्वीटचा अर्थ असा काढला जातो, की त्यांनी ट्वीट बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे. कारण त्यात ईव्हीएमचा उल्लेख आहे. युद्धाचा फायदा राजकारणासाठी घेतला जात आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
काश्मीर पहेलगाव येथे अतिरेकी हल्ल्यात २८ भारतीय नागरीक मारले गेले. या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात एकच लाट उसळली. या हल्ल्याचे प्रतिउत्तर दिले पाहिजे अशी सगळ्यांच नागरीकांना वाटत होते. देशावर झालेला आघात पाहता भारतीय सैन्याने या हल्याचे चोख उत्तर दिले. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर भागात हल्ले करुन पाकित्सातीन अतिरेकी अड्ड्यांचा खातपा केला. त्यानंतर सुद्धा भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर टू सुरु आहे. आत्ता भारत पाक युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या ऑपरेशन सिंदूर विषयी सोशल मिडियावर अनेक लोक व्यक्त होताना दिसून येत आहे. त्याविषयी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यात भाजपचे लोक आघाडीवर आहेत. भाजपच्या महिला पदाधिकारी शिवानी गोखले यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ये मिसाईले ईव्हीएम से ही चलती है, बस आपको सही बटन दबाना पडता है .
देशात भाजपचे सरकार आहे. सरकार भाजपचे असले तरी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा कारनामा केला आहे. पहेलगाव अतिरेकी हल्ल्यात भारतीय महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले. भाजप सरकार २०१४ पासून देशात सत्तेवर आहे. भाजपला मिळालेले यश ईव्हीएम मशीन मुळे आहे अशी टिका काँग्रेस पक्षासह अन्य विरोधी पक्षांकडून वारंवार केली गेली आहे. याच ईव्हीएममशीनचा उल्लेख गोखले यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आहे. त्यांनी मिसाईले ईव्हीएम से चलती आहे. बस आपको सही बटन दबाना पडता है असे बोलून होऊ घातलेल्या बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट करुन तमाम भारतीच्या भावना दुखावल्या आहे. गोखले यांच्या ट्वीटला मनसे आमदार पाटील यांनी रिट्वीट केले आहे.औकातीवर आले, खरे रुप दाखविले असे म्हटले आहे. गोखले यांच्या ट्वीटने भाजपचे खरे रुप उघड केले आहे. मनसे आमदार पाटील यांचे रिट्वीट हे भाजपचा खरे रुप उघडे पाडणारे आहे. या रिट्वीटमध्ये पाटील यांनी खाली #बीजेपी, # शेम,#शी _ वाणी # पुलवामा # उरी, # कारगील # ईव्हीएम # बिहार असे नमूद केले आहे. त्यांचे हे रिट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.