अमरावती : अमरावतीमध्ये काल राणा दांपत्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. राणा दांपत्य तब्बल ३६ दिवसांनतर अमरावतीत आल्यानं कार्यकर्त्यांनी एकच गर्दी करत त्यांची रॅली काढली आणि दुग्धाभिषेक घातला. मात्र, हा आनंदोत्सव राणा दांपत्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडला आहे.
दरम्यान अमरावतीत रॅली काढल्या प्रकरणी पोलिसांनी राणे दांपत्यासहित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रवी राणा नेमकं काय म्हणाले?
‘आम्ही अमरावतीत नियमांचे पालन करून रॅली आणि कार्यक्रम घेतला. तरीही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक गु्न्हा दाखल करतात. हनुमान चालीस पठण करणे गुन्हा आहे का ?, असा सवाल राणा यांनी अमरावती पोलिसांना केला आहे.
आमच्या कार्यकर्त्यांच्या तडीपाराच्या नोटिसा काढल्या जात आहेत’, असा आरोपही रवी राणा यांनी केला. पुढे राणा म्हणाले, ‘आमचा सर्व कार्यक्रम १० वाजून १० मिनिटांनी संपले. यापूर्वी मी दिल्लीत असताना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. अमरावतीच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात अखंड रामायण वाचलं जातं. तेथे मी हनुमान चालीसा पठण केले हा गुन्हा आहे का? , असा सवालही रवी राणा यांनी केला आहे.
[read_also content=”जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो; नितीन गडकरी यांचं वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/he-who-sins-in-a-previous-life-pulls-out-the-sugar-factory-statement-by-nitin-gadkari-nrdm-286265.html”]
दरम्यान, काल राणा दांपत्य ३६ दिवसानंतर अमरावतीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. तसेच त्यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केला. त्यावेळी चौकात राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते जमले होते. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राणा दांपत्याचे स्वागत एका मोठ्या हाराने करण्यात आले. यावेळी रवी राणा यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला.