बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत बुलढाणा(Buldhana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. मात्र रविकांत तुपकरांनी इतका टोकाचा निर्णय घेण्यामागची त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुपकरांचा आत्मदहनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या (farmers) अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन (soyabean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र (central governement) आणि राज्य सरकार (maharashtra government) गंभीर नसल्याचा (शनिवार) स्वाभिमानी संघटनेचे संघटक रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांचा आरोप आहे. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पिकविमा (crop insurance), अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली हाेती आणि आत्मदहनाचा इशारा दिला.
तीन दिवसांपासून होते भूमिगत
गेल्या तीन दिवसांपासून तुपकर भूमिगत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढला होता. तुपकर यांचे आंदाेलन हाेऊ नये यासाठी पाेलीस बंदाेबस्त हाेता. आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते. मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र सांगितले नव्हते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.
तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. पोलीस त्यांच्या मागावर हाेते. परंतु ते भूमीगत झाले. आज त्यांचे आंदाेलन हाेऊ नये यासाठी पाेलीस प्रयत्नशील हाेते परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तुपकर यांनी पाेलिसांच्या वेषात येऊन आंदाेलन छेडले. यावेळी तुपकर यांचे समर्थक माेठ्या संख्येने आंदाेलनस्थळी हाेते.