मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repair And Maintainance Work) आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक (Mega Block) परिचालीत करणार आहे. या कालावधीत मेन लाईनवर (Main Line) सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत लोकल ट्रेन्स उपलब्ध असणार नाहीत. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) आज मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT,Mumbai) येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड (Matunga And Mulund) स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही
हार्बर लाईनवर यापूर्वी जाहीर केलेला मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज हार्बर मार्गावर 16.04.2023 रोजी मेगाब्लॉक असणार नाही.