सदाभाऊ खोतांचे फडणवीसांवर भाष्य (फोटो- सोशल मीडिया)
सदाभाऊ खोतांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
फडणवीस यांच्यामुळेच आमदार झाल्याची भावना
सदाभाऊ खोत यांच्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता
SadaBhau Khot On Devendra Fadnavis: आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सदाभाऊ खोत यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी आमदार झालो अशी भावना सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस आहे, म्हणूनच मी आमदार झालो, असे खोत म्हणाले. मात्र आता या विधानाने राजकारण तपण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले सदाभाऊ खोत?
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी आमदार झालो, राजकारणात आलो. राजकारणात येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आधार लाभला. देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस आहे, म्हणूनच मी आमदार झालो. जर त्यांचे आडनाव देशमुख, पाटील असते तर, सदाभाऊ खोत कधीच आमदार झाला नसता.
सदाभाऊ खोत सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, मी अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो. आमच्याकडे पद आहे म्हणून आम्हाला विचारतात. राजकारणात येण्यासाठी राजकीय वारसदाराची गरज असते. तो आधार मला देवाभाऊंच्या रूपाने मिळाला. देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्यासाठी सावलीसारखे आहे. त्यांचे नाव फडणवीस ऐवजी जर देशमुख, पाटील असते तर, कधीही सदाभाऊ खोत आमदार झाला नसता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
शहरी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी एकत्रित थीम, दीर्घकालीन नियोजन आणि उपलब्ध निधीचा प्रभावी वापर या सूत्राचा वापरा करा. शहरांच्या भविष्यासाठी आज निर्णय घ्या, पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रातील शहरी भागांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नवीन आर्थिक आराखड्यावर चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
शहरांमधील मलनिस्सारण, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी फक्त आजचे नव्हे, तर पुढील पिढ्यांचा विचार करून नियोजन करा असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाणी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक यासाठी स्वतंत्र आराखडे आणि यावर लक्ष केंद्रीत करा, निव्वळ निधी पुरवठा न करता, रिसोर्स प्लॅनिंगवर भर द्या. जेथे फंडीग गॅप आहे, तिथे पूरक व्यवस्था करून प्रकल्प साकारा, स्थानिक संस्थांना पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य दिले पाहिजे आणि उभारलेल्या सुविधांचे मॉनिटरिंगही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.