आपल्या नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत चर्चेत राहणारे आणि नेहमी वाद ओढावून घेणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी तीन दिवसापुर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. अकोला येथे रविवारी रात्री झालेल्या व्याख्यानात भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केल्या गेलेल्या ‘त्या’ वादग्रस्त उल्लेखाचे स्पष्टीकरण करीत अप्रत्यक्षपणे त्याबाबतच्या वक्तव्याचे समर्थन केले. ‘लव्ह जिहाद’ हिंदुस्थानला नवा नाही, तो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, असे सांगत पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्याही संदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले. (Sambhaji Bhide On Love Jihad) सुरुवातीपासूनच हिंदू समाजावर विविध आक्रमणे होत आहे. हिंदू समाज विविध प्रलोभनांना बळी पडून ती सहन करत आला. यापुढे असे होता कामा नये. त्यासाठी समाजातील तरुणाईने पेटून उठले पाहिजे, असेही भिडे म्हणाले.
[read_also content=”Big Breaking! जयपूर ते मुंबई पॅसेजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, पोलिसांसह तिघांचा मृत्यू… https://www.navarashtra.com/maharashtra/big-breaking-firing-at-mira-road-and-virar-in-jaipur-to-mumbai-passenger-express-three-killed-including-policemen-438863.html”]
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. कधी महिलांच्या टिकलीवरुन, तर कधी मूल जन्मावरुन, कधी कोरोनावरुन तर कधी भारतमातेवरुनही संभाजी भिंडेंनी वादग्रस्त विधान केले आहेत. तीन दिवसापुर्वी अमरावती मध्ये आयोजीत व्याख्यानात त्यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला होता. यावरुन राज्यभरात वाद निर्माण झालेला असताना आता अकोला येथे रविवारी रात्री झालेल्या व्याख्यानात भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केल्या गेलेल्या ‘त्या’ वादग्रस्त उल्लेखाचे स्पष्टीकरण करीत पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.
नारायणचार्य या लेखकाने त्या काळी लिहिलेल्या पुस्तकातील महात्मा गांधींबद्दलच्या वादग्रस्त मजकुराचे वाचन प्रतिष्ठानचे स्वयंसेवक अविनाशबापू मरकडे यांनी केले. त्याचे स्पष्टीकरण देताना भिडे यांनी, ‘लव्ह जिहाद’ हिंदुस्थानला नवा नाही, तो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, असे सांगत पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्याही संदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले. सुरुवातीपासूनच हिंदू समाजावर विविध आक्रमणे होत आहे. हिंदू समाज विविध प्रलोभनांना बळी पडून ती सहन करत आला. यापुढे असे होता कामा नये. त्यासाठी समाजातील तरुणाईने पेटून उठले पाहिजे, असेही भिडे म्हणाले.