फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : लोकसभा निवडणूका पार पडल्याअसून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. स्वबळावर बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीए आघाडीतील घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यात आले आहे. यावेळी चंद्रबाबू नायडू व नीतिश कुमार यांना सोबत घेत हे सरकार स्थापन झाल्यामुळे हे लवकरच कोसळणार असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी देखील असाच दावा केला असून चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितीश कुमार यांचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे काही दिवसांचे पाहुणे आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हे पक्ष फोडून चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाहीत
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला आधी दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल. लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितले आहे.चंद्रबाबू नायडू यांचे मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि PMहे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमार यांचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे. आज त्यांच्या टेकूवर हे सरकार उभा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदींचे नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि आणि जनता द युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
टेकू कधी कोसळू शकतो
पुढे खासदार राऊत म्हणाले, चंद्राबाबू नायडू यांनी जर त्यांचा उमेदवार उभा केला अध्यक्ष पदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. या देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारला आहे, नाकारला आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला यांच्या झुंड शाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय. त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे पारदर्शक पद्धतीने आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने घटनेने विरोधी पक्षाला मिळायला हवे. आता नरेंद्र मोदींचा काय ताम जाम राहिलाय मला सांगा. टेकू वर बसले टेकू कधी कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलं आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.