संतोष देशमुख प्रकरणात सक्तीवर रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधिशांसोबत धुळवड, Video व्हायरल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करत खळबळ माजवली आहे. संतोष देशमुख प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आज धुळवड साजरी करताना दिसले. दोन्ही पोलीस अधिकारी संतोष देशमुख हत्याकंड प्रकरणात सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड साजरी करत होते. यावरून संतोष देशमुखांचे कुटुंबियांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
केज :- हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे …..
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत
पण… pic.twitter.com/16wfqJ6Cnh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 14, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांनी आज धुळवड साजरी केली. त्यांनी ही धुळवड संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी संशयित आरोपी यांच्या सोबत रंगाची उधळण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता आरोपीला वाचणारे निंलबित आधिकाऱ्यांसोबत यांचे लागेबांधे असल्यावर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला शिक्षा होईल का? असा प्रश्न सामानिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या,’संतोष देशमुख प्रकरणात दोन आरोपी होते, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी करत होतो. राजेश पाटील खंडणीची मागणी झाली, त्यावेळी टोळीसोबत होते. प्रशांत महाजन हे आरोपींना मदत करत होते. ते तिरंगा रेस्टॉरंटमध्येही उपस्थित होते. दोन्ही अधिकारी जजसोबत खेळत आहेत. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत. ते बघून काय बोलावं, असा प्रश्न पडला आहे.
‘न्यायाधिशांना आचारसंहिता असते. न्यायाधीशांनी नैतिक वर्णन करणे अपेक्षित असते. न्यायाधीशांनी संशयित आरोपींसोबत होळी खेळणे चुकीचे आहे. मी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत नाही. पण यांच्याकडील सुनावणी काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी कोर्टात करणार आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.