संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात आहे. त्यानंतर आज वाल्मिक कराडच्यावतीने दाखल केलेल्या जामिन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. पण या सुनावणीदरम्यान आरोपी कराडच्या वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. वाल्मिक कराड झाली त्यावेळी त्याला अटकेची कारणेच सांगण्यात आली नव्हती, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
वाल्मीक कराडच्या जामिन अर्जावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत त्याच्या जामिनाला विरोध दर्शविला.
कराडच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा यासाठी विविध मुद्दे मांडले. त्यावर निकम यांनी प्रत्युत्तर देत जामिनास तीव्र विरोध केला आणि विरोधाचे ठोस कारणेही न्यायालयासमोर मांडली. दरम्यान, दुसरा आरोपी विष्णू चाटे याने स्वतःच्या दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला. या संदर्भात न्यायालयाचे अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
निकम यांनी सांगितले की, वाल्मीक कराडच्या जामिन अर्जावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत त्याच्या जामिनाला विरोध दर्शविला. कराडच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा यासाठी विविध मुद्दे मांडले. त्यावर निकम यांनी प्रत्युत्तर देत जामिनास तीव्र विरोध केला आणि विरोधाचे ठोस कारणे न्यायालयासमोर मांडली. दरम्यान, दुसरा आरोपी विष्णू चाटे याने स्वतःच्या दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला. या संदर्भात न्यायालयाचे अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स
निकम म्हणाले की, आरोपीकडून अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली गेली नाहीत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, आम्ही ती बाब स्पष्ट करून न्यायालयाच्या निदर्शनास आणली. तसेच सुनील शिंदे यांनी केलेल्या मोबाईल फोन रेकॉर्डिंगच्या तारखेबाबत आरोपीकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर न्यायालयासमोर सीडीआर रेकॉर्ड ठेवण्यात आले असून त्यानुसार संबंधित तारखेला फोन कॉल झाल्याचे स्पष्ट होते. हा पुरावा प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेस सादर करू, असेही निकम यांनी सांगितले.
विष्णू चाटेबाबत निकम म्हणाले की, त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा आधीपासून दाखल आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नाही, असे म्हणण्यास अर्थ नाही. मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, व्यक्तीला नव्हे. त्याचवेळी निकम यांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही न्यायालयाच्या निदर्शनास आणली. खंडणीच्या प्रकरणात चाटे हा कराडला सहकार्य करणारा व त्याचा उजवा हात असल्याचेही नमूद करण्यात आले. वाल्मीक कराडच्या जामिन अर्जावर पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
आजच्या सुनावणीबाबत बोलताना दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, आरोपीच्या वकीलांनी आरोपाल जामीन का दिला जावा, यावर युक्तीवाद केला. पण उज्ज्वल निकम यांनी जोरदार प्रतिवाद केला. आरोपीला जामीन का मिळून नये, यासाठी त्यांनी युक्तीवाद केला. हे आरोपी आहेत आमि त्याच्या पाठीमागे कोण आहेत, हेही स्पष्ट झालं आहे. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होण्याची आमची अपेक्षा आहे, नियती कुणालाही सुटू देणार नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे.