File Photo : Solapur ZP
सोलापूर : महीला व बाल विकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांची लातूर येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्रसाद मिरकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या महीला व बाल विकास विभागाने ३० जून रोजी बदलीचा आदेश जारी केला आहे. माजी डेप्युटी सीईओ देवत्त गिरी यांची बदली सोलापूरहून लातूर येथे झाली होती. अगदी त्याच पद्धतीने जावेद शेख यांची बदली झाली आहे.
जावेद शेख हे मुळचे बार्शीचे असून, त्यांनी महीला बालकल्याण विभागात नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा यथोचिछित प्रयत्न केला. माजी सदस्य त्रिभुवन धाईंजे आणि उमेश पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्नांचा भडीमार करीत व्यासपीठाला धारेवर धरले होते.
टप्पा अनुदान कार्यक्रमा प्रसंगी गोंधळ उडाला होता. दरम्यानच्या काळात सीईओ दिलीप स्वामी यांनी जावेद शेख यांच्याकडे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारीची जबाबदारी सोपवली होती. शासनाने दिलेल्या नियमानुसारचं टप्पा अनुदानाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली, असं जावेद शेख यांनी सांगितले.