'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी (Photo : iStock)
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांचा कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, लागवड सुरू आहे. असे असताना बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी-बियाणे व रासायनिक खताचा तुटवडा भासवून ज्यादा दराने शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खतांची विक्री करून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाचे भरारी पथक फक्त नावालाच आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून, शेतकरी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची ओढ शेतकऱ्यांना लागली असल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यातील परिसरात मागील काही दिवसांपासून मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा आनंदात दिसत आहे. तूर, मूग, उडीद, कपाशी बियाणे अजित १५५ व अजित ५ या बियाणांची दाम दुप्पट करून विक्री होत आहे. तर काही कृषी सेवा केंद्र चालकाकडून कपाशी बियाण्यांचे व रासायनिक खताचे कमी पैशाचे दुकानाचे बिल शेतकऱ्यांना देऊन दाम दुप्पट पैसे वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
हेदेखील वाचा : Bus Drivers Trike : 30 हजार स्कूल बससह खासगी बस चालक उद्यापासून बेमुदत संपावर; शाळा, आषाढी वारीवर परिणाम होण्याची शक्यता
काही कृषी चालकांकडून दुसऱ्या राज्यातून निकृष्ट दर्जाचे शाश्वती नसलेल्या बियाण्याने खरेदी करून ते जवळच्या नातेवाईकांच्या घरी ठेवल्या जाते. त्यानंतर शेतकऱ्याची दिशाभूल करून विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत असल्याने कृषी विभागाचे भरारी पथक बघ्याची भूमिका घेत आहे, अशी शक्यता आता वाटू लागली आहे.
कृषी केंद्र चालकावर कारवाईची मागणी
असे असताना कृषी विभागाकडून पंढरपूर तालुक्यातील कृषी केंद्र चालकावर कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या कारणाने कृषी विभागाचा वचक कृषी सेवा चालकांवर नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : कुर्ला ते विमानतळापर्यंतचा सुपरफास्ट प्रवास! दक्षिण आशियातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल कधी येणार सेवेत?