वाई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला कायम आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाढा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर
सामाजिक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
आमदार पाटील म्हणाले, की या पुरस्काराची सुरूवात १९९६ साली झालेली असूनयंदाचे २६ वे वर्षे आहे. देश एका विशिष्ट संक्रमण अवस्थेतून जात असताना मधुकर भावे यांच्यासारख्या अत्यंत पुरोगामी, क्षमतावादी आणि लोकशाहीच्या मूल्यांचा,व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारास आबांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचा विशेष आनंद होत आहे. या पुरस्काराचे वितरण माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत असणार होणार आहे. १ लाख रूपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण गोकुळाष्टमीस गुरूवार दि. १८ रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, कार्यकर्ते, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व
संचालक मंडळाने केले आहे.






