PPhoto Credit- Social media
धुळे: “राज्य सराकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. पण आपल्या बहिणींची अब्रू कोण वाचवणार? बहिणींचा सन्मान कोण राखणार पण त्याकडे या सरकारचं मुळीच लक्ष नाही.” अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते धुळ्यातील शिंदखेडा येथे आयोजित एका सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या अनेक योजनांवर जोरदार टीकाही केली. शरद पवार म्हणाले, ‘मी दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम केले. त्यवेळी देश अन्नधान्यांच्या बाबत स्वंयपूर्ण झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी कसलीही आपुलकी नाही. शेतीसंदर्भातलं योग्य धोरण राबवले जात नाही. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नाही. गहू, तांदळाबाबतही हेच झालं. जे पिक घ्याल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी केली. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे.’
हेही वाचा: भाजप मोठा पक्ष, त्यांना विधानसभेमध्ये तडजोड…; शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत
तसेच, महाराष्ट्रात गुंडांच राज्य सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. पण राज्य कारखाने, सहकार चळवळीसाठी काहीही केलं नाही. रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज
या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याया लोकशाहीचे विचार दिले. पण या लोकांना सत्तेचा माज चढळा आहे. आता यांना खड्यासारखे बाजूला करायचं आहे. येत्या निवडणुकीत तुम्हाला हीच संधी आहे. त्यासाठी एकदा आमच्या हातात सत्ता द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा बदलेला दिसेल, अशी खात्री मी तुम्हाला देतो. असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा: मोठी बातमी ! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देणार राजीनामा