संजय निरुपम यांची संजय राऊतांवर टीका (फोटो - सोशल मिडिया)
मुंबई: भांडूपचा भोंगा मोदी द्वेषाने पछाडलेला असल्याने त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या भांडूपच्या भोंग्यावर निरुपम यांनी टीका केली.
मुंबईत सुरु असलेल्या वेव्हज परिषदेचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले. हा कार्यक्रम अनेक महिने आधी निश्चित केला होता. तो बदलता येत नाही, असे निरुपम म्हणाले. ही परिषद आंतरराष्ट्रीय परिषद असून त्या ५७ देशांचे प्रतिनिधी आहेत. तो ब़ॉलिवुडचा कार्यक्रम नाही, असे निरुपम म्हणाले. जगभरातील नेते पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाचा सन्मान करतात, मात्र केवळ राजकारण आणि द्वेषापोटी संजय राऊत मोदींजींचा अपमान करतात, अशी टीका निरुपम यांनी केली.
पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून होते तर उबाठाचे नेते परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, अशी टीका निरुपम यांनी केली. उबाठा पक्ष संपलेला आहे. त्यांच्या पक्षावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असे निरुपम म्हणाले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी लष्कराकडून युद्धसराव केला जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाने एकत्र असणे आवश्यक असताना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावी जातात कारण ते शेतकऱ्याचे पुत्र आहेत. गावाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. तेथील लोकांना सोबत घेऊन विकासाची कामे करतात, असे निरुपम म्हणाले. मात्र त्यांच्यावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो, असे ते म्हणाले.